अनुनाद विषयी

चित्रकला, शिल्पकला, अक्षर, कविता आदी कला विषयक उत्तमोत्तम साहित्य प्रकाशित करणे आणि प्रसार करणे तसेच विशेषतः मराठी भाषेत चित्रकला, शिल्पकला विषयक साहित्य निर्माण व्हावे, जे कोणी या विषयांवर मराठीतून लेखन करीत असतील अश्या सिद्धहस्त, चिंतनशील, लेखक कवी यांना एक व्यासपीठ उपलब्ध करून द्यावे आणि दृक्-कलेच्या विद्यार्थ्यांच्या आणि कलासक्त प्रेक्षकांच्या दृक- जाणिवांची समृद्धी व्हावी हे प्रमुख उद्दिष्ट समोर ठेऊन अनुनाद प्रकाशन काम करीत आहे.

अनुनाद प्रकाशन तर्फे
प्रसारित होणारा
नाद पहिला
प्रभाकर कोलते लिखित
‘दृकचिंतन’

प्रख्यात भारतीय चित्रकार, प्राध्यापक आणि लेखक प्रभाकर कोलते सर १९९८ पासून २०२१ पर्यंत विविध दिवाळी अंकातून आणि वर्तमानपत्रातून चित्रकले संदर्भातील अनेक विषयांवर सातत्याने अभ्यासपूर्ण लिहीत आले आहेत. त्यांनी लिहिलेल्या अनेक लेखांपैकी भारतीय आणि पाश्चात्य अशा एकतीस चित्रकारांवरील सखोल चिंतनात्मक लेख संकलित केलेलं हे पुस्तक रूपात घेऊन येताना आम्हाला विशेष आनंद होत आहे.
दृक्-कलेच्या विद्यार्थ्यांच्या आणि कलासक्त प्रेक्षकांच्या दृक- जाणिवांची समृद्धी व्हावी यासाठी कोलते यांनी दिलेलं हे एक सर्जन देणं आहे. ते आपल्याला घेता यावं!

असे अनेकविध एकामागोमाग एक असे अनेक नाद निर्मितीसाठी आम्ही प्रयत्नशील आहोत…