प्रभाकर कोलते, १९९८ पासून २०२१पर्यंत विविध दिवाळी अंकातून आणि वर्तमानपत्रातून चित्रकले संदर्भातील अनेक विषयांवर सातत्याने अभ्यासपूर्ण लिहीत आले आहेत. त्यांनी लिहिलेल्या अनेक लेखांपैकी भारतीय आणि पाश्चात्य अशा एकतीस चित्रकारांवरील सखोल चिंतनात्मक लेख संकलित केलेलं हे पुस्तक… या पुस्तकात मूळ चित्रांच्या प्रतिकृती या सर्व चित्रकारांना किंवा त्यांच्या वारसदारांना संपर्क करून त्यांच्या परवानगीने छापल्या जाणार आहेत.
चित्रकलेसाठी, चित्रकलाविषयक मराठी साहित्यात मोलाची भर घालणारे ठरावे… अर्थातच प्रत्येक लेख वाचनीय आणि मननीय आहे; दृक्-कलेच्या विद्यार्थ्यांच्या आणि कलासक्त प्रेक्षकांच्या दृक- जाणिवांची समृद्धी व्हावी यासाठी कोलते यांनी दिलेलं हे एक सर्जन देणं आहे.